जळगाव — जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्या समस्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे ,खासदार उन्मेश पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे उपस्थित होते.याप्रसंगी जळगाव तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, धरणगाव तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल आप्पा पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष अड.अतुल मोरे, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, शहराध्यक्ष रमेश वाणी, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तालुकाध्यक्ष तसेच भाजप पक्ष कार्यालय मंत्री गणेश माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांचेशी सर्वच तालुकाध्यक्षांनी शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ते एम एस ई बी सारख्या विविध समस्यांवर चर्चा केली. खा. उन्मेश पाटील यांनी विविध तालुकाध्यक्ष यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी भावना व्यक्त केली.