भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत पाटील व सौ.नेवेंना संधी

0

चोपडा – भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण संघटनेची नुकतीच घोषणा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी जाहिर केली आहे.त्यामध्ये चोपडा तालुक्यातील गत जिल्हा कार्यकारणीतील चिटणीस राकेश शांताराम पाटील (वडगाव बु॥) यांना उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे.

 

तर तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका सौ.रंजना श्रीकांत नेवे यांची चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सौ.नेवे अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनेत विविध पदावर कार्यरत असून वेगवेगळ्या सामाजिक संघटनेत सातत्याने काम करतात.तर राकेश पाटील तरुण तडफदार कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती पाटील जि.प.सभापती देखील आहेत.

 

या नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचे नाशिक विभाग ओबिसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल,जेष्ठ नेते शांताराम पाटील, जी.टी.पाटील,चंद्रशेखर पाटील, तिलकचंद शहा,माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके,जि.प.सभापती ज्योती पाटील, उज्ज्वला म्हाळके,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,कृउबा सदस्य धनंजय पाटील,भरत पाटील, माजी राज्य परिषद सदस्य मगन बाविस्कर,माजी शहराध्यक्ष राजु शर्मा,नरेंद्र पाटील, मुन्ना शर्मा,रवींद्र मराठे,हनुमंत महाजन,भरत सोनगिरे,देविदास पाटील, सुनिल सोनगिरे,मनोहर बडगुजर,प्रकाश पाटील, तुषार पाठक,भारती क्षिरसागर,रावसाहेब पाटील, डॅा.मनोज सनेर,डॅा.आशिष पाटील, डॅा.नरेंद्र अग्रवाल,माजी नगरसेवक पप्पू सोनार,हेमंत जोहरी,संजय श्रावगी,गोविंद सैंदाणे, मनिष पारिख, प्रवीण चौधरी,हिंमतराव पाटील,पं.स.सदस्या कल्पना पाटील,दिपक बाविस्कर,कमलबाई चौधरी,किरण पालिवाल,माधुरी अहिरराव,दिपक पाटील,विनायक पाटील,  आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.