भाजपचे पूर्व प्रदेश अध्यक्ष नंदू भैया यांचे निधन

0

प्रतिनिधी:- रजनीकांत पाटील

भारतीय जनता पक्षाचे पूर्व प्रदेश अध्यक्ष आणि खंडवाचे सांसद नंदकुमार सिंग चौहान उर्फ नंदू भैया यांचे दिल्लीतील मेदांता हॉस्पिटल मध्ये निधन झाले. मागील एक महिन्यापासून ते दवाखान्यात उपचार घेत होते. ११ जानेवारीला करोना पॉजिटीव्ह आल्यावर भोपाळच्या दवाखान्यात त्यांचा उपचार सुरु होता.

प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना उपचारासाठी दिल्लीत आणले गेले पण आज मंगळवारच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण भारतीय जनता पक्षातुन व राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनीही नंदू भैया यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो असे शोकोद्गार व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.