भाजपचा शिवसेनेच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप ; कोर्टात जाणार

0

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक आज गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी करणारे जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला असला तरी पिठासीठ अधिकार्‍यांनी याला रद्द केले आहे. तर भाजपने या प्रकरणी कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे.

आज पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. यात अ‍ॅड. सुचीता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाल्याचे वृत्त आहे.

यामुळे निवड प्रक्रिया सुरू असतांना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम २००५ च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.