जळगाव- जळगाव येथील कांचन नगर भागात राहणारी अतिशय गरीब कुटुंबातील दगडू नत्थु चौधरी यांची मुलगी भाग्यश्री चौधरी ने सर्व मुलीं पुढे क्रीडा क्षेत्रातील आदर्श निर्माण केला आहे. असे प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुं झरकर यांनी केले.विद्यार्थिदशेपासून खेळ अभ्यास वकृत्व आवड असणाऱ्या या मुलीने जिल्हास्तरीय मनपा क्षेत्र शालेय क्रीडा स्पर्धेच्या कबड्डी स्पर्धेत तसेच आशा महोत्सव आयोजित शिवपुत्र शंभूराजे महानाट्य पुरस्कृत स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे यश मिळवले.वडील हमाल मापाडी चे काम करत असताना इयत्ता दहावी त या मुलीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ८१.८०% मार्क मिळवून अभिनव विद्यालयात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले. रोटरी च्या वतीने आयोजित रोटरी सायक्लोथॉनचा स्पर्धेत तिने प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले. जागतिक युवा दिनाच्या वकृत्व स्पर्धेत तिने सर्वांची मने जिंकल्याने व क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील तिचे नैपुण्य पाहून राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य महासचिव तसेच मराठा सेवा संघ प्रणित डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष यां नात्याने शिक्षक संघटना राज्य समन्वय समिती व पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पत्र देऊन गौरव केला. आणि मुलींनी देखील क्रीडा क्षेत्राची कास धरावी असे आवाहन केले.याप्रसंगी जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी उर्फ छोटू आबा भगत एरंडोल, टमाट्याचे व्यापारी तथा भाग्यश्री चे काका सुभाष दादा नथू चौधरी जळगाव, युवा कार्यकर्ते प्रवीण चौधरी, गोलु चौधरी, कौतिक नाना चौधरी, भाग्यश्री च्या आई ,वडील तसेच चि.कविराज चौधरी उपस्थित होते. पेढा भरवून माझा मराठा सेवा संघ प्रणित पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी व शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीने केलेला गौरव कायम स्मरणात राहील असे यावेळी बोलताना भाग्यश्री चौधरी हिने म्हटले. मुलीने देखील क्रीडा क्षेत्राकडे वळावे असे यावेळी बोलताना राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आवाहन केले.