भांडे विक्री व्यवसायासाठी दोन दिवस जादा परवानगी मिळावी

0

भुसावळातील भांडे व्यावसायीकांचे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन 
भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील भांडे विक्री करणार्‍या व्यावसायीकांना आठवड्यातील केवळ दोन दिवस भांडे विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून आणखी दोन दिवस परवानगी वाढवून द्यावी, अशी मागणी शहरातील भांडे विक्री करणार्‍या व्यावसायीकांनी केली आहे. सोमवारी प्रांताधिकारी प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आले. शहरात केवळ दहा भांडे विक्रीची दुकाने असून आठवड्यातून आणखी दोन दिवस वाढवून दिल्यास व्यावसायीकांना सोयीचे होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर रवींद्र मुळे (शंकर वामन मुळे), नितेश मुळे (न्यू वामन गणपत मुळे), ज्ञानेश्‍वर मुळे (मुळे जनरल स्टोअर्स), निवृत्ती मुळे (समर्थ ट्रेडर्स), राहुल मुळे (दत्तात्रय शंकर मुळे), वसंत सोनू कासार (विजय मेटल), मोहन चंद्रकांत कासार (सोनू नारायण कासार), विनोद मुळे (पांडुरंग वामन मुळे), अमोल मुळे (त्र्यंबक वामन मुळे), किशोर चिंचोले (के.के.मेटल), संदीप कासार (पौर्णिमा मेटल्स) आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.