Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भविष्य निर्वाह निधी खाते उतारे आता एका क्लिकवर उपलब्ध
    जळगाव

    भविष्य निर्वाह निधी खाते उतारे आता एका क्लिकवर उपलब्ध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भविष्य निर्वाह निधी खाते उतारे आता एका क्लिकवर उपलब्ध

    जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ; महिनाभराच्या आत त्रृटी कळविण्याचे आवाहन

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे सन 2024-25 चे खाते उतारे हे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कर्मचा-यांना एका क्लिकवर हे खाते उतारे उपलब्ध होणार आहे.
    जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाअंतर्गत कार्यरत भविष्य निर्वाह निधी शाखेकडून हे खाते उतारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेचे काम हे पारदर्शक पद्धतीने व जलद गतीने होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे कामकाज करण्यावर भर दिला आहे. यात ई-ऑफिस प्रणालीचा वापर मोठ¬ा प्रमाणावर वाढला असून ‘पेपरलेस वर्क’ याकडे जिल्हा परिषद जळगावची वाटचाल सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद जळगाव संकेतस्थळ नवीन रूपात सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर अशा सुमारे सात हजारांवर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उतारे हे जिल्हा परिषदेच्या http ://zp jalgaon.gov. In या न्न्संकेतस्थळावर आयटी सेलमार्फत दि.24/09/2025 रोजी उपलब्ध करण्यात आले आहे. खाते उतारे संकेतस्थळावर अद्यावत करण्याकामी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. विनोद चावरीया, लेखाधिकारी श्री. अशोक तायडे, सहाय्यक लेखाधिकारी श्री. किरण पाराशर, कनिष्ठ लेखाधिकारी श्री. गुलाबराव आसाराम पाटील, आयटी सेल प्रमुख श्री. प्रशांत होले यांच्या मार्गदर्शनखाली भ.नि.नि शाखेतील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

    खाते उतारा कसा पहावा
    जिल्हा परिषद जळगावच्या संकेतस्थळावर ई- प्रशासन या सेक्सनमध्ये जावून पीटी किंवा अदर किंवा एम.के यानुसार कर्मचारी प्रवर्ग निवडून आपला खाते उतारा क्रमांक टाकून एका क्लिकवर सन 2024-25 या वर्षाचा पूर्ण हिशेबाचा खाते उतारा पीडीएफ स्वरूपात संबधित कर्मचारी यांना मिळणार आहे. दरम्यान, या खाते उतारा-यात काही त्रृटी असल्यास संबधितांनी कार्यालय प्रमुख यांच्या शिफारशीने भविष्य निर्वाह निधी शाखेत एका महिन्यात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif