प्रभाग 20 मधील विद्यार्थ्यांचा सत्कार ; वातानुकूलीन शाळा व बालोद्यान चे लोकार्पण
भुसावळ | प्रतिनिधी
भविष्याचे नियोजन करा आयुष्यात पुढे जाण्यास आणि प्रगती करण्यास नियोजन मदत करते, तुमचे निर्णय तुम्हीच घ्या, तुमची मित्रमंडळी वाढवा, अथक परिश्रमातून स्वतःची प्रगती करणाऱ्यांच्या संगतीत राहा, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मधील दीनदयाल नगरातील नगरपालिका शाळा क्र. 35 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय वातानुकूलित शाळा खोल्यांचे लोकार्पण माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या हास्ते फीत कापून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.प्रसंगी आयोजक पाणी पुरवठा सभापती महेंद्रसिंग ठाकूर यांनी केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करीत गौरव केला.
खेळणी, बालोद्यानाचे लोकार्पण
लहान मुलांसाठी खेळणी, बालोद्यानाचे लोकार्पण खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे,शफी पहेलवान प्रा.डॉ. सुनील नेवे, युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, मनोज बियाणी, मुन्ना तेली, वसंतदादा पाटील, विजय चौधरी, अजय नागराणी, ॲड. बोधराज चौधरी, किरण कोलते, देवा वाणी, सोनल महाजन, शोभा नेमाडे, अमोल इंगळे, राजू आवटे, विकी बत्रा, सतीश सपकाळे, प्रमोद सावकारे, दिनेश नेमाडे, महेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह आदी उपस्थित होते.
राबविले विविध कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती महेंद्रसिंग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. प्रतिकूल परिस्थितीत पहिली ते बारावी यश प्राप्त करणारे प्रभाग 23 मधील 104 विद्यार्थ्यांना आकर्षण प्रमाणपत्र व फाईल तसेच पालकांना जेवणाचा डबा देऊन सन्मानित करण्यात आले . कष्टकरी पालक या सत्काराने भारावले. शहीद भगतसिंग रिक्षा स्थानकाच्या 40 रिक्षाचालकांना गणवेश( कपडे ) देऊन सन्मानित करण्यात आले तर शाळा क्रमांक 35 च्या 96 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तथा दप्तर देऊन सन्मानित केले. दहावी सीबीएससी परीक्षेत एकता महेंद्रसिंग ठाकूर हिचा 92 टक्के गुण मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेचे सुशोभीकरण करणारे कलावंत नितीन सुरवाडे यांना 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले . तर शाळा खोली बांधकाम करणारे युनूस मिस्त्री यांचा सत्कार करण्यात आला .
परिश्रम करा ,कष्ट करा – आ सावकारे
यश मिळविण्याचा मार्ग कितीही खडतर व लांब असले तरी त्याकरिता कोणताही शॉर्टकट शोधू नका यश वनक्की मिळणारच आत्मविश्वास वाढवा असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी उपस्थित विद्यार्थ्याना केले.
नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
या कार्यक्रमासाठी नगरसेवक महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर, संजय ठाकूर, अरुण धनगर, किरण मिस्त्री, हर्षल कोळी, विकास राखुंडे, उमेश ठाकूर, आकाश राजपूत, शेखर पाटील, प्रवीण परदेशी, प्रदीप सपकाळे, निखिल वाणी, जगदीप ठाकूर, बबलू इथापे, रितेश शिंदे, हर्षल कोळी, विकी ठाकूर, दगडू पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षिका आणि शिक्षक यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार दिनेश नेमाडे यांनी मानले.यावेळी प्रभागासह परिसरातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.