अहमदाबाद :– गुजरातमधील सुरेंद्र नगर येथे प्रचारसभेदरम्यान, एका अज्ञान व्यक्तीने पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या कानाशिलात लगावली. तरुण मिस्त्री असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. त्यासाठीच, आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुण मिस्त्री असे या व्यक्तीचे नाव असून ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.
#WATCH Congress leader Hardik Patel slapped during a rally in Surendranagar,Gujarat pic.twitter.com/VqhJVJ7Xc4
— ANI (@ANI) April 19, 2019