Monday, January 30, 2023

भरधाव डंपरची दुचाकीला धडक : भुसावळातील युवकाचा मृत्यू

- Advertisement -

भुसावळ (प्रतिनिधी)-  दोन दुचाकी व डंपरमध्ये झालेल्या अपघातात भुसावळातील युवकाचा मृत्यू झाल्याची मंगळवारी दुपारी अडीच वाजता भुसावळ-फैजपूर मार्गावरील अकलूद फाट्याजवळ घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केल्याने डंपरच्या काचा फुटल्या. या अपघातात अजय पिपसिंग ढिंक्याव (38, वाल्मीक नगर, भुसावळ) याचा मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. फैजपूर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

अपघातानंतर डंपरवर जमावाची दगडफेक

अकूलद गावाजवळील एकविरा हार्डवेअरच्या समोर मंगळवारी दुपारी अडीच वाजता दोन दुचाकी व डंपर (एम.एच.19 डी.एन.9891) यांच्यात अपघात होवून दुचाकीवरील अजय ढिंक्याव याचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात अन्य एक जण जखमी झाल्याचे समजते. अपघातस्थळी सहायक फौजदार हेंमंत सांगळे, महेश वंजारी, ज्ञानेश्वर पवार, उमेश सानप यांनी धाव घेतली.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे