भरधाव डंपरची दुचाकीला धडक एक ठार, तिघे गंभीर

0

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी कुसुंबा येथील बसस्थानकाजवळ घडली. रूपाली भैय्या पाटील (वय-28) मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, डंपर चालकाला ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली पाटील ह्या आपली मुलगी श्रेया भैय्या पाटील (वय-2.5) हीच्या सोबत कुसुंबा ता.जि.जळगाव येथे काकांकडे मंगळवारी रात्री 12.30 वाजेला आल्या. मयत रूपाली यांचे लासुर ता. चोपडा हे मुळगाव असल्याने शेतीच्या खरेदीच्या निमित्ताने त्या सकाळी भाऊ निलेश दिलीप पाटील आणि बहिण प्रतिक्षा दिलीप पाटील यांच्यासह लासुरे येथे जाण्यासाठी बसस्थानकावर दुचाकीने येत असतांना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच 19 झेड 6465) ने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या रूपाली भैय्या पाटील या मागच्या चाकात येवून जागीच मृत्यू झाला. तर मुलगी श्रेया पाटील, बहीण प्रतिक्षा पाटील आणि भाऊ निलेश पाटील गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रूपाली पाटील यांचे पती मुंबईतील विरार येथे रेल्वेत नोकरीला आहे. अपघात झाल्यानंतर नागरीकांना डंपर चालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.