भरधाव ट्रकने रस्त्यावर झोपलेल्या पादचाऱ्यांना चिरडले ; १ ठार, ४ जखमी

0

वसईः भरधाव ट्रकने रस्त्यावर झोपलेल्या पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जमावाने ट्रक चालकाला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठड्याला धडकली. या कठड्यावर झोपलेल्या पाच जणांना ट्रकने चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. या अपघातात फळांच्या गाड्याचेही मोठे नुकसान झाले. ही ट्रक वसईकडे जात होती. या अपघातात दोन मोटारसायकलचेही नुकसान झाले. स्थानिक रहिवाशांनी ट्रक चालकाला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. ट्रक चालकाने मद्यपान केलेले होते. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी ट्रक चालकाला पाठवले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात ट्रकच्या पुढच्या भागाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.