भरधाव अ‍ॅपे कारची समोरासमोर धडक

0

महिला जागीच ठार ;१२ प्रवासी जखमी ; आमोदाजवळील घटना

फैजपूर- प्रवासी घेऊन भरधाव वेगाने भुसावलकडे जाणाऱ्या अ‍ॅपे रीक्षाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार तर १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना आमोदा गावाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास येथे घडली . जखमींनारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , फैजपूरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येत असलेली प्रवासी अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.१९-८४५१) समोरून येणार्‍या कार (एम.एच.१९ ए.पी.१२६३)वर आदळून झालेल्या अपघातात महिला प्रवासी जागीच ठार झाली तर अन्य १२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आमोद्याजवळ झाला. या अपघातात सुनीता प्रकाश भंगाळे (५०, चिनावल) या जागीच ठार झाल्या.

गायत्री गतीसिंग परदेशी (३०, बर्‍हाणपूर), निर्मला विकास झांबरे (४५, भुसावळ), निर्मला विकास बेलदार (४५, कुंभारखेडा), वंदना कैलास बेलदार (४५, कुंभारखेडा), भागवत इंगळे (४५, सिंगत) यांच्यासह अन्य १२ प्रवासी जखमी झाले. अ‍ॅपे रीक्षा धडकेनंतर तीन ते चार वेळा रस्त्याच्या कडेला उलटली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.