भडगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रूग्णांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर आठवडाभरात कोरोना हद्दपार होईल. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याचा मृत्यूदर २.३ वरून १ टक्क्यावर आल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केला. त्यात, भडगाव तालुक्याची स्थीती चांगली असल्याचे ही त्यांनी सांगीतले. शुक्रवारी (ता. २३) त्यांनी भडगाव ग्रामिण रूग्णालयात कोविडचा उपचार घेणाऱ्या रूग्णांची भेट घेतली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात अधिकारी व पत्रकारांशी चर्चा केली.
भडगाव ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली .यावेळी सोबत डॉ प्रशांत पाटील, डॉ पंकज जाधव, डॉ प्रतिक भोसले,डॉ नितीन सोनवणे, नायब तहसीलदार रमेश देवकर, पालिकेचे कार्यालय अधिक्षक परमेश्वर तायडे आदी उपस्थित होते .
यावेळी डॉ चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की , हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी भडगाव सह चाळीसगाव, पारोळा, जामनेर, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर यासह दहा ठिकाणी जागा बघितले आहे . भडगाव येथेही ग्रामीण रुग्णालयात हा प्रकल्प लवकरच तयार होणार आहे. याकरिता डीपीडिसी तुन प्रकल्प खर्च करण्यात येणार आहे. जागा पाहणी, नंतर निविदा व लगेच काम असे महिना भरात काम सुरू होणार आहे . सद्या जिल्ह्यात ४० मॅट्रिक टन ऑक्सिजन ची मागणी असून त्यात केवळ ३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन उपलब्ध होतो, हा कटोकट साठा वाढला पाहिजे . स्थिती गंभीर असून नागरिकांनी शासनाने जाहीर केलेले सर्व नियम पाळले तर स्थिती सुधारू शकतो. मृत्यू प्रमाण कमी होऊ शकते . तर कोरोना चाचणी व लसीकरण नीट होत असल्याने सद्या तालुक्यातील पॉझिटिव्ह रेट ७.१४ आहे. भडगाव तालुक्याच्या पॉझिटिव्ह रेट तसा कमी झाला असल्याची माहिती डॉ प्रशांत पाटील यांनी दिली . याबाबत डॉ चव्हाण व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी रात्रंदिवस सर्व आरोग्य यंत्रणा व आशा काम करत आहे. याबद्दल त्यांची स्थुती केली.
नियम तोडून भरमसाठ रुग्ण तपासणार्या प्रायव्हेट डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर लगाम लागणार आहे. त्यांच्या साठी रुग्णांची नोंद वही ठेवण्यात यावी अशा सूचना देणार आहे. तसेच येथील आयटीआय येथे नव्याने २४ ऑक्सिजन बेड ची व्यवस्था सुरू केली असून असून यासह अन्य भागासाठी नव्याने एक आयुष्य डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. यात १ वैद्यकीय अधिकारी , १ डीटीपी ऑपरेटर, ४नर्स, वार्ड बॉय आदी नेमले असून आवश्यकतेनुसार अजून २ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी नेमण्याची गरज आहे.