भडगाव येथे स्वखर्चातून दिले २४ ऑक्सिजन बेड ; २४ ऑक्सिजन बेडचे मास्टर लाईन कोविड केअर कक्ष सुरू

0

भडगाव (सागर महाजन) : पाचोरा रोड वरील शासकीय कोविड सेंटर येथे मास्टर लाईन ऑइल कंपनीचे संचालक समीर जैन व सुयोग जैन यांनी मास्टर लाईन फौंडेशन च्या “मास्टर लाईन कोविड केअर कक्ष च्या संकल्पनेतुन २४ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहे. एका व्यक्तीने व कुटुंबाने सर्व खर्च स्वतः उचलून २४ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याच्या बातम्या येत होत्या.  शिवाय प्रशासनाने ही सामाजिक योगदानाचे आवाहन केले होते. त्यामुळे

आपण ही समाजच देणं लागतो म्हणून या कोरोना विषाणूच्या गंभीर संसर्गजन्य रोगात नागरिकांचे होऊ नये , म्हणून घेतलेले हे पाऊल तालुक्यासाठी लाभदायक ठरेल असे मास्टर लाईन कंपनी चे संचालक समीर जैन सुयोग जैन यांनी सांगितले.

भडगाव येथील शासकीय औद्योगिक वसाहतीच्या हॉल मध्ये आज दि१६ रोजी  मास्टर लाईन  कँपनी कडून देण्यात आलेल्या ऑक्सिजन बेड चे काम पूर्ण झाले अजून हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आज सायंकाळी सोशलडिस्टन्स ठेऊन महसूल विभागाच्या वतीने उदघाटन सोहळा पार पडला .कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उन्मेष पाटील ,प्रमुख पाहुणे आमदार किशोर पाटील ,उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे , समीर जैन , सुयोग जैन , तहसीलदार सागर ढवळे , डॉ पंकज जाधव , डॉ प्रतीक भोसले , मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे, डॉ भूषण मगर , टोंनगाव तलाठी राहुल पवार,मनोज सिसोदिया,  शैलेश तोतला, सुरेश भंडारी, सुभाष राका, अमोल पाटील, सोमनाथ पाटील, सुधाकर पाटील, महेंद्र ततार, प्रदीप देसले, आदी उपस्थित होते.

नागरिकांसाठी भडगाव येथे २४ ऑक्सिजन बेड  दिल्याने समीर जैन व सुयोग जैन यांचा तर पाचोरा येथे १६ ऑक्सिजन बेड  दिल्याने डॉ भूषण मगर व मनोज सिसोदिया यांचा सत्कार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी लक्ष वेधत सर्वसामान्य जनतेला महागाईच्या वेळी व जेथे बेड शिल्लक नाहीत अशा कोरोना काळात ऑक्सिजन सुविधेसह बेड उपलब्ध करून दिल्याने कौतुक केले . शिवाय कोरोनाच्या भयंकर स्थितीची जाणीव करून देत भडगाव च्या किराणा व भाजीपाला व्यावसायिकांनी स्वतःहून सांगत आम्ही आठ दिवस बंद ठेवायला तयार आहोत,  पण परिस्थिती नियंत्रणात आना असे सांगितले , त्यांचे कौतुक केले . राजकारण बाजूला ठेऊन आपण सर्वांनी कोरोनाच्या संघर्षात एकत्र आले पाहिजे असे मत आमदार पाटील व खासदार उन्मेष पाटील यांनी बोलतांना  व्यक्त केले . शिवाय उन्मेष पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.  दरम्यान प्रास्ताविक पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, समीर जैन यांनीमनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी , प्रमुख नागरिक उपस्थित होते.

 

कोरोना रूग्णांची संख्या कधी कमी तर कधी झपाट्याने जास्त . त्यामुळे बेड उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ येत होती . तालुक्यातील केवळ ३० ऑक्सिजन बेड क्षणार्धात फुल असायचे . अशात रुग्णांची ऑक्सिजन बेड साठी फिरफिर होऊ म्हणून मास्टर लाईन फौंडेशन कडून दोन्ही बंधूनी यांनी स्वखर्चाने २४ ऑक्सिजन बेड देण्याचे ठरविले .आज काम पूर्ण झाले . त्याचा नागरिकांना तात्काळ लाभ सुरू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.