भडगाव (प्रतिनिधी) : येथील गिरणा नदी पुलावर दोन मोटरसायकलींचा सामोरा समोर अपघात झाल्याने यात ४४ वर्षीय देविदास गुंजाळ रा. मोंढाळे ता. पाचोरा हा मयत झाला असुन २ जण जखमी झाले आहेत. याबाबत भडगाव पोलिसात मयताचा चुलत भाऊ किशोर विठ्ठल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन कल्पेश भोसले रा. आमडदे. ता. भडगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना दि. ६ रोजी भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी कि,दि. ६ रोजी मयत देविदास खंडू गुंजाळ वय ४४ वर्ष रा मोंढाळे ता पाचोरा हा सायंकाळी ४ वाजता होंडा शाईन एम एच १९ बी झेड -१५३३ वरून वेल्हाणे ता जिल्हा धुळे येथून परिवारासह मोंढाळे ता. पाचोरा गावाकडे जात होते. त्यावेळेस दुसरी बजाज प्लॅटिना मोटारसायकल क्र एम एच १९- ए टी ४९३१ वरील कल्पेश भोसले हा आमडदे गावाकडे जातांना भडगाव गिरणा नदीच्या पुलावर समोर धडक दिल्याने या अपघातात देविदास गुंजाळ यास डोक्याला गंभीर दुखापत झाली . पुढील उपचारासाठी पाचोरा येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्युनोंद करण्यात आली . व दि ८ रोजी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या अपघातात मयताची पत्नी जखमी झाली आहे. व आरोपी कल्पेश भोसले हाही जखमी झाला आहे. कल्पेश भोसले
याच्यावर धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवुन गाडीच्या नुकसानीसह मयताच्या मरणास कारणीभुत ठरला . म्हणुन कल्पेश भाऊसाहेब भोसले . रा .आमडदे ता. भडगाव यांच्या विरुद्ध भादवी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७,मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन वाबळे करीत आहेत.

