भडगाव येथे मंगलकार्यालयात काॅरंटाईन झालेल्या नागरिकांचे हाल

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात कोरोना चा आलेख वाढत असून यातील काॅरंटाईन केलेल्या नागरिकांना येथील मंगल कार्यालयात काॅरंटाईन केले जात आहे. कार्यालयात नागरिकांना पाणी नाही टॉयलेट/ बाथरूम अस्वच्छ आहे. जेवण वेळेवर नसून नागरिकांचे काॅरंटाईन होहुन हाल होत आहे.

या बाबत सदर प्रशासनाला या बाबत कोणी फोन लाऊन तक्रार केली तर त्याला आरोपी अर्वाच्य भाषेत चांगलेच सुनावले जात आहे. म्हणजे जसे काॅरंटाईन झालेल्या व्यक्तीने भला मोठा गुन्हा केलेला आहे अशी वागणूक सध्या मिळत असल्याचे बोलले जात असून . या बाबत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.