भडगाव येथे भीमगीतांचा जंगी सामना रसीकांची प्रचंड गर्दी

0

भडगाव

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था टोनगाव भडगाव यांच्या विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्ह्या जयंती निमित्ताने भीमगीतांचा जंगी सामना महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक राजू बागुल मुंबई व सुप्रसिद्ध गायिका सुवासिनी शिंदे यांच्यात नुकताच करण्यात आला सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिपप्रजवलन करून गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ आंबेडकर या महामानावांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भीमगीतांचा माध्यमातून समाज प्रबोधन करून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांची आजच्या काळात गरजेचे असल्याचे सांगितले यात ससिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अनेक वर्षांपासून प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व योग्य नियोजन केल्याने संस्थेचे अध्यक्ष तथा रिपाई चे भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांचा जाहीर सत्कार मान्यवर म्हणून उपस्थित असलेले डॉ.संजीव पाटील यांनी केला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोरआप्पा पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, अविनाश अहिरे, गणेश जावरे,नगरसेवक अमोल पाटील,लीलावती फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.प्रमोद पाटील.दौलत जोंधळे,वैदयकीय अधीक्षक डॉ.पंकज जाधव,भाजपा वैदयकीय आघाडी चे डॉ.संजीव पाटील.डी.एम.पाटील,पाचोरा नगराध्यक्ष संजय गोईल,कजगाव सरपंच दिनेश पाटील,माजी जि.प.सदस्य श्रवण लिंडायत,डॉ.शेखर पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील,डॉ.भूषण मगर,उधोजक समीर जैन, सुरेंद्र मोरे,डॉ.किशोर पाटील,व पी. के. पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी.खेडकर व सचिव शांताराम सोनवणे यांनी आभार मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.