भडगाव येथे प्लास्टिक विक्रेत्यांवर नपाची कारवाई

0

प्लास्टिकचे साहित्य जप्त ; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
भडगाव ;- महाराष्ट्र शासनाने संपूर्ण पणे प्लास्टिक पिशवी बंदी केल्यानंतर भडगाव शहरात सर्रासपणे प्लास्टिक विक्री सुरू आहे. या बाबत भडगाव नगरपालिकेने आज शुक्रवारी प्लास्टिक विक्रेत्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून माल हसगत केला आहे . पालिकेच्या या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .
या बाबत अधिक माहिती अशी की , भडगाव नगरपालिकेतर्फे वेळोवेळी शहरात व्यापारी यांना तोंडी व नोटिसा देऊन सूचना देण्यात आल्या होत्या . परंतु संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्यासाठी आज भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह कर्मचारी छोटू वैद्य, सर्पमित्र विजय कडारे, मनीष पवार, परेश पाटील, कल्याण देशमुख, संजय नरवाडे, राजेंद्र पवार, सुनील पवार, रवींद्र जाधव, दिलीप कोळी, किशोर पाटील, सुरेश पाटील आदि कर्मचारी यांनी आज सकाळ पासून धडक कारवाईला सुरुवात करून माल् जप्त केला. यात प्लास्टिकचे विविध उत्पादने जसे पिशवी, ग्लास, द्रोण, पत्रावळी असे सर्व प्लास्टिकचे साहित्य जप्त केले.या कारवाईमुळे नागरिक यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.