भडगाव – भडगाव येथील तहसिलदार माधुरी आंधळे यांची नगर येथे बदली झाली आहे. त्यांचे जागी भडगावी जळगाव जिल्हा करमणुक अधिकारी मुकेश रामकृष्ण हिवाळे यांची प्रभारी तहसिलदार म्हणुन नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली आहे. आज मुकेश हिवाळे यांनी प्रभारी तहसिलदार पदाचा पदभार आज घेतला असुन ते रुजु झाले आहेत. त्यांचा कार्यालयीन कर्मचार्यांमार्फत पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी कार्यालयीन कामकाजाबाबत अधिकारी, कर्मचार्यांची आढावा बैठक घेतली.यात राजस्व अभियान, उभारी योजना, शासकीय महसुली वसुली, ७/१२ संगणकीय, आगामी ग्रामपंचायत मतदार यादया, कोरोना बाबतची परीस्थिती यासह सर्व कामांबाबत आढावा बैठक घेतली. अधिकारी व कर्मचार्यांना सुचना केल्या. यावेळी निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर, मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. यापुर्वी मुकेश हिवाळे यांनी भडगाव, पाचोरा, जळगाव,अशी एकुण १० वर्ष चांगली सेवा बजावली आहे. पाचोरा येथे नायब तहसिलदार पदी, जळगाव येथे करमणुक कर अधिकारी पदी, तर भडगाव येथे सुरुवातीस एकुण ८ वर्ष चांगली सेवा बजावली आहे. त्यावेळी निवाशी नायब तहसिलदार, संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार पदी चांगली सेवा बजावली आहे. त्यांचा भडगाव तालुक्यात चांगल्या कामकाज बजावल्याचा ठसा आहे. त्यांना भडगाव तालुक्यात कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते गोरगरीब जनतेसह शेतकरी, नागरिक, विदयार्थी यांना चांगला न्याय देतील. अशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना अपेक्षा आहे. तसेच तालुक्यात गिरणा नदीच्या पाञातुन भडगाव शहरासह तालुक्यात अवैध वाळु उपसा , गौण खनिज चोरी सर्रास होत आहे. हा अवैध वाळुचा उपसा व गौण खनिज चोरी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांचे पुढे आहे.अवैध वाळु चोरीवर आळा बसवावा. इतर वाढत्या तक्रारींचे निर्सन करावे. नागरीकांना योग्य तो न्याय दयावा. अशी अपेक्षा शहरासह तालुक्यातील नागरीकातुन व्यक्त होतांना दिसत आहे. तहसिलदार माधुरी आंधळे यांची नगर येथे बदली झाल्याने त्यांचा तहसिल कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी बांधवांमार्फत पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील , भडगाव तालुका पञकार संघाचे सचिव- सागर महाजन, माजी अध्यक्ष अशोक परदेशी, माजी अध्यक्ष संजय पवार, माजी अध्यक्ष सुनिल कासार,यांचेसह पञकार संघातील पञकार बांधवांमार्फत तहसिलदार माधुरी आंधळे यांचा सत्कार करण्यात आला.