भडगाव येथे कुषी विभागाकडुन बोंड अळी व किटनाशके हाताळणी प्रशिक्षण

0

भडगाव – सागर महाजन

भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी भडगाव येथील श्रीराम मंगल कार्यालय भडगाव येथे कापुस पिकावरील गुलाबी बोंड अळी चे व्यवस्थापन व सुरक्षित किटकनाशके हाताळणी बाबत एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले त्यासाठी सकाळी प्रतिमापुजन मान्यवराच्या हस्ते झाले त्याच बरोबर कुषी विभागातील विविध योजनातील लाभार्थी यांना शेतीउपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले या कर्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पाचोरा भडगाव आमदार किशोर आप्पा पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आर.ओ.पाटील ,जळगाव कुषी उपसंचालक अनिल भोकरे ,संजिव पाटील कापुस पैदास शास्त्रज्ञ ,भडगाव कुषी आधिकारी बी.बी .गोर्डे,माजी जिप सदस्य विकास पाटील ,पंचायत समितीचे उपसभापती प्रताप सोनवणे,पंचायत समितीचे सदस्य रामकुष्ण पाटील ,रावण भिल,माजी उपसभापती संभाजी भोसले,पंचायत समितीचे कुषी आधिकारी बी.बी.बोरसे ,कुषी विस्तार अधिकारी डी.एन .निकुंब ,कुषी मंडल आधिकरी ऐ.व्ही .जाधव.मनोज सैंदाणे ही व्यासपीठावर उपस्थित होते सदर प्रशिक्षणात कुषी विघापीठाचे शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले
यावेळी संजिव पाटील कापुस पैदास शास्त्रज्ञ यांनी आपली मनोगतातुन सांगितले की जमीनीची माती परीक्षण करावे,आंतरपिके घेणे हे शेतकरी बांधवाना फायदाचे आहे ,खताची लागवड वेळोवेळी करावी रासायानिक खते योग्य वेळी देणे,कपाशी पिकामध्ये तणनाशक फवारणी कमी करावी यानंतर जिल्हा उपसंचालक अनिल भोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की शेती करताना जागुरुता महत्वाची आहे ,शेती करताना उपाययोजना करणे महत्वाचे आहे ,शेतकरी बांधवानी बोंळ अळी आधी समजुन घ्यावे,बोंळ अळी वर उपाय योजना करणे महत्वाचे आहे कपाशीची फरदड घेणे टाळावे,शेतात काम गंध सापळे लावावेत ,औषधी फवारणी करताना काळजीपुर्वक करावी ,शेतातील डोम अळी नष्ठ कराव्यात ,योग्य तंत्रज्ञानांचा वापर करावा यांनतर आमदार किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले शेतकरी बांधवानी बोंळ अळी ला धाबारून जावु नका त्यावर उपाययोजना करणे महत्वाचे आहे त्यासाठी शेतकरी बांधवानी कुषी विभागाशी संपर्क साधावा ,बोड अळी साठी शासन खुप मोठया प्रमाणावर काम करत आहे ,शेतकरी बांधवान साठी कुषी विभागाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी माजी आमदार आर.ओ.पाटील,व मेहतापसिंग नाईक यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी भडगाव तालुकातील मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमासाठी कुषी विभाग भडगाव,पंचायत समिती कुषी विभाग,भडगाव सिडस,फेस्टीसाईड,फर्टीलायझर्स असोशियन भडगाव तसेच ,भडगाव सहकारी फळविक्री सोसायटी भडगाव यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पंचायत समितीचे कुषी आधिकारी बी.बी बोरसे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.