भडगाव येथे कवि केशवसुत व्याख्यानमाला दि. १८ जानेवारीपासुन सुरु होणार

0

भडगाव –   येथील कवी केशवसुत व्याख्यानमालेस २५ वर्ष पुर्ण झाले.या २५ वे रौप्यमहोत्वानिमित्त दि. १८ जानेवारी ते २२ जानेवारी या ५ दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षाप्रमाणे यावर्षीही करण्यात आले आहे. शोभायाञा, ग्रंथदिंङीसह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. हा कार्यक्रमाचा सोहळा भङगाव येथील बाळद रोङ लगत ङी एङ काॅलेजच्या ग्राउंङवर आयोजीत करण्यात आला आहे. तरी व्याख्यानासह या कार्यक्रमांचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन भङगाव येथील केशवसुत ज्ञानप्रबोधीनी मार्फत करण्यात आले आहे. याबाबत माहीती अशी कि, आद्य कवी केशवसुत यांचे भडगाव शहरांत ४ वर्ष वास्तव्य होते .त्यांनी गिरणा नदीच्या किनाऱ्यावर बसून अनेक आशयगर्भ कविता रचल्या म्हणून त्यांना आद्यकवितेचे जनक असे म्हटले जाते .अशा नामांकित कवीची स्मृती चिरकाल टिकावी म्हणून १९९६ साली केशवसुत ज्ञानप्रभोधिनीची स्थापना करण्यात आली ,ज्याद्वारे पाच  दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी केले जाते .यंदाचे हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे ,त्या निमित्ताने रसिक श्रोत्यांना विविध उत्तोमत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .

दि. १८ जानेवारी रोजी सकाळी  ९ वाजता  केशवसुत वाचनालयापासून शोभा यात्रा व ग्रंथ दिंडी निघणार आहे .शोभायात्रेत विविध सामाजिक ,शैक्षणिक संस्था ,युवक मंडळे सहभागी होणार आहेत .सायंकाळी ५ वाजता रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेचे उदघाटन रान कवी ना .धो .महानोर यांच्या हस्ते व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा .सदानंद देशमुख यांच्या उपस्थित संपन्न होईल .यावेळेस पुस्तकं प्रदर्शन व प्रदर्शनीचे देखील उदघाटन केले जाईल .व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सांगली येथील वक्त्या प्रा .सौं .प्रीती शिंदे या स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या विषयावर गुंफणार आहेत .दि. १९ जानेवारी रोजी दुपारी अहिराणी  कथाकथन आयोजित केले आहे .धुळे येथील प्रा .योगिता पाटील ,दोंडाईचा येथील प्रा .संजीव गिरासे व मालेगाव येथील यात सहभागी होतील .दुसरे पुष्पात रामदास फुटाणे ,अशोक नायगावकर ,नारायण पुरी ,नितीन देशमुख ,भरत दौंडकर यांचे हास्य कविसंमेलन संपन्न होईल .दि. २० जानेवारी रोजी विविध शाळेतील विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील व रात्री तिसऱ्या पुष्पात महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर हे लोकराजे राजश्री शाहू महाराज या विषयावर आपले मत व्यक्त करतील .दि. २१ जानेवारी रोजी स्थानिक कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठाद्वारे आपली कला सादर करतील व रात्री  टीव्ही हास्यसम्राट प्रा .दीपक देशपांडे हे हास्य कल्लोळ हा विनोदी कार्यक्रम सादर करतील .दि. २२जानेवारी रोजी शाहीर शिवाजी पाटील यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम सादर होईल .व्याख्यान मालेचा समारोप सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ .निशिगंधा वाड ह्या मला भेटलेल्या लेकी सुना या विषयाने करतील .

सदर व्याख्यान माला डी .एड .कॉलेज ,बाळद  रोड ,भडगाव येथें संपन्न होणार आहे .भडगाव रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .

अशी माहीती कवी केशवसुत ज्ञानप्रबोधीनी आयोजीत पञकार परीषदेत आयोजकांनी पञकारांशी बोलतांना दिली. ही पञकार परीषद दि. १४ रोजी भङगाव येथील आशिर्वाद प्लाझामधील केशवसुत ज्ञानप्रबोधीनीच्या कार्यालयात सायंकाळी ७ वाजता पार पङली. यावेळी पत्रकार परिषदेस  ज्ञाकवि केशवसुत ज्ञानप्रबोधीनीचे अध्यक्ष विजय देशपांडे ,उपाध्यक्ष डॉ .विलास देशमुख ,सचिव प्रा .डॉ .दीपक मराठे ,ज्ञानप्रभोधिनी  कार्यकर्ते नागेश वाघ ,सुरेश भंडारी ,प्रा .डॉ .दिनेश तांदळे ,डॉ .ईश्वर परदेशीं ,डॉ .दुर्गेश रूळे ,सौं .वैशाली शिंदे ,योगेश शिंपी ,अन्वर पठाण  , सुनिल कासार, साहेबराव जाधव उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.