भडगाव येथे आज राष्ट्रवादीची बैठक

0

पाचोरा :- माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) पाचोरा येथे दुपारी २ वाजता भडगावरोड वरील प्रसाद मंगल कार्यालयात व भडगाव येथील सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात दुपारी ४ वाजता बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेणे.आगामी विधानसभा २०१९ बाबत बूथ कमेट्या व संघटनात्मक चर्चा विनिमय करणे. या बाबत माजी आ.दिलीप वाघ मार्गदर्शन करणार आहे.

सदर बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आजी- माजी जेष्ठ पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती व शेतकरी सहकारी संघ संचालक,अल्पसंख्याक,किसान सेल, मागास सेल,ओ. बी. सी. सेल,युवक-युवती, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा-भडगाव तालुका व शहर राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.