भडगाव येथे अनधिकृत औषधांचे रॅकेट बिनधास्त सुरू

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात गोरगरीब जनता औषधांसाठी पै- पै जमा करून रुग्ण बरे होईल यासाठी वणवण फिरत असताना. भडगाव शहरात अनधिकृत पने टेबलावर औषधी अव्वाच्या सव्वा भावाने विकत असलेले रॅकेट सध्या जोरदार सुरू असून या बाबत प्रशासन अनधिकृत पने औषधी विकणाऱ्या रॅकेट वर कारवाई करणार का असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांकडून होत आहे.

भडगाव शहरात एका केअर सेंटर मध्ये उपचार घेत असताना या औषधी घेऊन या असे सांगितल्या नंतर नातेवाईक औषधी घेण्यासाठी जात असताना तुम्हाला इथेच औषधी मिळतील असे सांगितल्या नंतर त्या नातेवाईकाने त्या औषधींचा तपास जागेवर केला व बाहेर मेडिकल वर केला असता त्यामध्ये सहाशे रुपयाचे फरक पडला व तेथे तो रुग्णाचा नातेवाईक औषधी घेऊन तुमच्याकडे या औषधी इतक्या महाग का? तुमचे तर इथे मेडिकल नाही तुम्ही मला बिल देऊ शकता का. असे विचारले असता सदर अनधिकृत औषधी विकणाऱ्या रॅकेट ने आपल्या बिढ्यार बांधून राफादफा झाले.

सदर असा प्रकार भडगाव शहरात सुरू असून रुग्ण हे आपले जीव वाचवण्यासाठी वण वण फिरत असून दुसरीकडे पैशे कमविण्यासाठी अनधिकृतपणे औषधी टेबल वर विकण्याचा गोरख धंदा सध्या भडगाव शहरात सुरू असून यावर प्रशासन कारवाई करणार का असे रुग्णाच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.