भडगाव येथील हॉटेल,चहा, रेस्टॉरंट,भोजनालय व व्यापारीअसोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील

0

भडगाव (प्रतिनिधी) :- भडगाव येथे हॉटेल,चहा, रेस्टॉरंट,भोजनालय व व्यापारी असोसिएशन मालकांची बैठक पार पडली. प्रशासना कडून सर्वांना वेळीच निर्णय माहीत होतं नसल्याने हॉटेल व अन्य व्यवसाय अवेळी बंद सुरू ठेवण्यात अडचण येते. केव्हाही बंद पुकारण्यात येतो, कोणता व्यवसाय करावा यात अडचण येते व त्यामुळे दुकान व्यावसायिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे असोसिएशन ची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात घेतले जाणारे निर्णय. कायद्याचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवण्या बाबत निकष पालन व अंमलबजावणी करणे. शिवाय असोसिएशनची नोंदणी करणे, सदस्यांची अडीअडचणी, सोडवण्यासाठी काम करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. मास्क व सोशल डिस्टन्स ठेऊन बैठक पार पडली. तर काही सदस्यांनी ऑनलाईन पध्द्तीने बैठकीत सहभाग घेतला. यावेळी असोसिएशन च्या अध्यक्षपदी सर्वानुमते नरेंद्र पाटील यांची म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीत शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, चहा, मालक ऑनलाइन व प्रत्यक्ष सहभागी झाले .
यात सर्वानुमते खालील कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष- नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष:-नितीन महाजन, उपाध्यक्ष :- कुद्दुस मण्यार , उपाध्यक्ष – शेख शाकिर
सचिव – रवींद्र महाजन, खजिनदार – चुन्नू सैय्यद, सहसचिव – आदेश जैन ,
सदस्य सुलक्षण बोरसे, संजय भोई, प्रकाश भोई, धीरज जयस्वाल, शेख नाजीम यांची निवड करण्यात आली.
व्यावसायिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणार असून असोसिएशन च्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या अडी अडचणी, कागदपत्रे नोंदणी, आरोग्य तपासणी , रिटर्न भरणे, यासह विविध कामे करणार असल्याचे नूतन सदस्यांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.