भडगाव ;- येथील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित राहिलेले मेन रोड रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम अखेर नगरपालिका कडून चालू करण्यात आले. या रस्त्याचे या अगोदर दोन वेळेस निविदा काडून काम रखडलेले होते आणि आता तिसऱ्या वेळेस चार महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर करून मंजूर करण्यात आला पण तरीही हे काम घेण्यासाठी कोणी कंत्रादारांकडून तयार होत नव्हते. शहरातील संभाजी पाटील यांनी हे काम घेऊन व्यापारी वर्गाला दिलासा दिला . आज काम चालू केले त्यावेळी काँट्रॅक्टर संभाजी पाटील यांचा सत्कार सर्व व्यापारी वर्गाने केला .यापॆसंगी जेष्ठ व्यापारी सुधाकर वाणी यांच्या हस्ते करण्यात आला . नंदकिशोर मोराणकर, महेश मोराणकर, ईश्वर सुतार ,नितीन शिरसाठ, डॉ शहानवाज खान, गजानन सोनजे, माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे संस्थापक महेंद्र ततार, योगेश सोनजे, संदीप भंडारी, दादा पाटील, दीपक तांबटकर, नाझीम चाहवाले, सुनील भदाणे, गंभीर पिंजारी, प्रशांत दुसे राहुल सोनार, लोकेश जैन, दिलीप राऊत आबा जडे सुंजू भोई सुनील भोई व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते . रस्त्याचे काम चालू केले त्यावेळी श्रीफळ वाढवून व साखर वाटून सर्व व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला.