भडगाव | प्रतिनिधी
भडगाव पोलीस स्टेशनला सुमारे 06 वर्षापासून चोरी अपघात व बेवारस स्थितीत मिळून आलेली वाहने पडून आहेत वाहनांची यादी भडगाव पोलीस स्टेशन नोटीस बोर्डवर वाहन क्रमांक व चेसिस क्रमांकासह लावण्यात आलेली आहे ज्या कोणी नागरिकांचे वाहन भडगाव पोलिस स्टेशनला जमा असले त्यांनी खात्री करून घेऊन वाहन मालकी हक्काबाबत चे मूळ दस्तऐवज सादर करून आपापली वाहने परत घेऊन जावेत. जर 07 दिवसाच्या आत वाहनांमधील कोणीही नागरिकाने मालकीहक्क नसल्याबाबतचे दस्तऐवज सादर केले नाही त्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथून मूल्यांकन करून मा.न्यायदंडाधिकारी तसेच कार्यकारी दंडाधिकारी भडगाव यांचे कडून कायदेशीर लिलावाची परवानगी घेऊन सदरची वाहने हे लिलाव करून लिलावाची रक्कम सरकार भरणा करण्यात येईल असे आवाहन भडगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्ष अशोक रा. उतेकर यांनी केले आहे.