भडगाव-पाचोरा तीन दिवस लॉकडॉऊन ; काय सुरु काय बंद राहणार?

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव आणि पाचोरा नगर परिषद हद्दीत दिनांक १९ मार्च ते २१ मार्च २०२१ या कालावधी मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दिनांक 19 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये लॉक डाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. कृपया पाचोरा आणि भडगाव नगरपालिका हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व्यवसायिक परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी.

सदर आदेश हा दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी तसेच दिनांक 21 मार्च 2021 या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व  परीक्षेसाठी जाणारे परीक्षार्थी तसेच या परीक्षेसाठी सेवा वर्ग अधिकारी कर्मचारी यांना लागू असणार नाही. व पाचोऱ्यात सर्व आठवडे बाजार बाजारपेठा,किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र,शैक्षणिक संस्था शाळा,महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील तसेच हॉटेल रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी व पार्सल वगळता) सर्व बंद राहील त्याच बरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन,पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे,पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.