भडगाव :- भडगाव नगरपरीषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत रस्ते काँक्रीटीकरण, खङीकरण, ङांबरीकरण रस्ते, गटारी, पेठ ते भङगाव गिरणेवरचा पुल, घरकुल, पर्यटन व तिर्थक्षेञ विकास योजनेअंतर्गत साई मंदीर,नुतन वाडधे, श्री चक्रधर स्वामी मंदीर, भवानी मंदीर या तिन्ही मंदीर परीसरात विविध विकास कामे यासह अजेंङयावरील विविध एकुण ६८ विकास कामे विषय मंजुर करण्यात आले. ही सभा दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता पार पङली.
तसेच वैशिष्टयपुर्ण योजना अंतर्गत कामे प्रस्तावित करणे यात शहरातील विविध ओपन स्पेसमध्ये उदयाने विकसीत करणे. तळणी भागातील उदयानाकरीता आरक्षीत असलेली जागेत उदयान विकसीत करणे. बाजार चौक मटन मार्केट ते पेठ भागात गिरणा नदीच्या पाञात पुलाचे बांधकाम करणे.व हा प्रस्ताव शासनाकङे मंजुरीसाठी पाठविणे. यासह विविध ६८ विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी नुतन नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.वसीमबेग मिर्झा, शिवसेनेचे गटनेते राजेंद्र पाटील, राष्टृवादीचे गटनेते प्रशांत पवार, नगरसेविका करुणाताई देशमुख, सुशिला पाटील, राजेंद्र देशमुख, भिकनुर पठाण, प्राजक्ता देशमुख, रंजना पाटील, शामकांत भोसले, योजना पाटील,अमोल पाटील, कमलाबाई अहीरे, संजय भिल्ल, वैशाली महाजन,कल्पना भोई, नंदकिशोर पाटील , डॉ प्रमोद पाटील आदि नगरसेवक, मुख्याधिकारी विकास नवाळे आदि उपस्थित होते.