भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरासह तालुक्यात सर्रासपणे सुरू असलेला सट्टा – मटका जुगार, पत्त्यांचे क्लब तत्काळ बंद व्हावे अन्यथा लवकरच भडगाव पोलिस स्टेशन समोर सट्टा खेलो- पत्ता खेलो (बिना पैश्यांचे) आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना देण्यात आले.
या निवेदनात नमूद केले आहे की, भडगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे सट्टा- मटका, जुगार , पत्त्यांचे क्लब सुरू आहे सध्या कोरोना सदृश परिस्थिती असताना सुद्धा सट्टा पत्यांच्या दुकानावर गर्दी जाणवत आहे. तसेच सदरचा सट्टा – मटक्याचे दुकान पोलिस स्टेशन समोरील वर्धमान मेडिकलच्या बाजूला चहाच्या दुकानात, विजय बार च्या पूर्व दिशेला दुकानात, पुनम बियर बारच्या समोरील भाजीपाला दुकानाच्या बाजूला भडगाव बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला पारोळा चौफुली, आझाद चौक, च्या परिसरात, महालक्ष्मी उपाहार ग्रुहाच्या समोर , यशवंत नगर तसेच तालुक्यातील कजगाव, गिरड, कोळगाव, या ठिकाणी सर्रास पणे सट्टा- मटका घेतला जात आहे. सदर ठिकाणी गर्दी जमत असून. या मुळे ये- जा करणाऱ्या शाळकरी मुले ,तरुण, जाणकार माणसांवर या खेळाचा परिणाम होत असून कोरोनाची सदृढ परिस्थिती लक्षात घेता मनमानी पणे सट्टा मटका भडगाव शहरातून घेतला जात आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावात कजगाव, गिरड, कोळगाव या ठिकाणी सुद्धा सर्रास सुरू आहे. तरी या बाबत तत्काळ लक्ष घालून सदरचा सट्टा मटका तत्काळ बंद करावा. बंद न झाल्यास लवकरच भडगाव पोलिस स्टेशन समोर सट्टा खेलो पत्ता खेलो ( बिना पैसे) आंदोलन करणार आहोत.
तसेच कोरोना सदृढ परिस्थिती लक्षात घेता आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न उद्भवल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवदास आप्पा महाजन, भिमराव पाटील, मनोहर चौधरी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती गृहमंत्री मुंबई, पोलिस महासंचालक मुंबई, पोलिस आयुक्त नासिक, जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव, डी. वाय. एस. पी. चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत.