भडगाव तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

0

बोरनार येथे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य जागांसाठी पोटनिवडणुक

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरनार ग्रामपंचायत लोकनियूक्त सरपंच पदासह एकुण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे.तर भट्टगाव, लोणपिराचे,वडगाव बु,पिंप्रीहाट, आंचळगाव,अंतुर्ली बु प्रत्येकी एक सदस्य जागा पोटनिवङणुका लागल्या आहेत.अशा एकुण ७ ग्रामपंचायतीच्या एकुण १२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुक होत आहे.तर बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवड होत आहे. अशा एकुण १३ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. अशी माहीती तहसिल निवडणुक विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दिली. माघारीनंतर खरे चिञ स्पष्ट होणार आहे.

याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील एकुण ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. बोरनार येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसुचित जाती महीला हे आहे. या सरपंच पदासाठी २ अर्ज प्रशासनास प्राप्त झालेले आहेत. यात मिनाबाई रविंद्र बोराङे व सुनंदा अंकुश बोराङे या दोघांचे लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्ज प्रशासनास प्राप्त झालेले आहेत, आता एकुण ६ सदस्य पदासाठी पोटनिवङणुक होत आहे. ६ सदस्य पदाच्या जागांसाठी फक्त ६ उमेदवारी अर्ज प्रशासनास प्राप्त झालेले आहेत. तसेच भट्टगाव येथे एका सदस्य पदाच्या पोटनिवङणुक जागेसाठी अनुसुचित जमाती महीला हे आरक्षण आहे. येथे माञ एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्तच राहणार आहे. लोणपिराचे येथे सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठी सर्वसाधारण महीला हे आरक्षण आहे. येथे एकही अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्तच राहणार आहे. वङगाव बु येथे सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठी अनूसुचित जमाती महीला हे आरक्षण आहे. येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे ही जागा रिक्तच राहणार आहे. पिंप्रीहाट येथे सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठी अनुसुचित जमाती महीला हे आरक्षण आहे. माञ येथे एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने ही जागा रिक्तच राहणार आहे. आंचळगाव येथे अनुसुचित जमाती महीला हे सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठी आरक्षण आहे. माञ येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्तच राहणार आहे. तसेच अंतुर्ली येथे सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठी अनुसुचित जाती हे आरक्षण आहे. येथे एका जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत. उमेदवारी माघारीची तारीख २५/११/२०१९ आहे. त्यामुळे माघारी नंतरच खरे चिञ स्पष्ट होणार आहे. मतदान दि. ८/१२/२०१९ रोजी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.