भडगांव – प्रतिनिधी
तालुक्यातील जवळपास तीस ते पस्तीस गावात साडेचार हजार हेक्टर वरील पिकांचे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती, गोठे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यात शेतकऱ्यांची पशुहानी देखील मोठ्या संख्येने झाली आहे, तरी सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासन दरबारी मदत मिळवुन देण्यासाठी राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून प्रयत्न करणार असल्याचे मा. आमदार दिलीप वाघ यांनी वाडे व परिसरात पिकांची पाहणी करताना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला मदतीचा हात मिळावा हिच एक अपेक्षा व्यक्त केली.
या पाहणीदर्म्यान भडगांव माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व्हि. एस. पाटील, शिक्षक सेल चे सुनिल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील , शरद पाटील ,वाडे गावाचे सरपंच यशवंत पाटील, देविदास माळी,आप्पा पाटील, आण्णा चौधरी, उदय परदेशी, परेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.