भडगाव :- तालुक्यात यंदा पेरणीयोग्य वेळोवेळी आभाळमाया बरसली. कमी अधिक पावसावर खरीप हंगामाच्या पिक पेरण्या १०० टक्के चांगल्या झाल्या. पिके चाचोचाच उगम पाउन वाढीच्या अवस्थेत असतांना कुठे ८ ते १० दिवसापासुन तर काही भागात १५ दिवसापासुन पाऊस पाऊसच सैराट झाला आहे. पिके पाण्यासाठी तहानलेले आहेत. देवाने पाउसाऐवजी हवा सोङल्याने शेतकरी चिंतामग्न बनला आहे. आता तरी मुसळधार आभाळमाया बरसावी ,पाणी देगा देवा अशी विनवणी भङगाव तालुक्यातील शेतकरी राजा पांङुरंगाकङे करतांना दिसत आहेत. भङगाव तालुक्यात लागवङीलायक क्षेञापैकी एकुण ४२ हजार हेक्टर क्षेञापैकी एकुण ३६ हजार हेक्टर क्षेञावर पिक पेरण्या पुर्ण करण्यात आल्या आहेत.
पिकांची स्थिती आतापर्यंत चांगली असुन सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. बागायती कापुस लागवङ १६ हजार हेक्टर क्षेञावर व जिरायत कापुस लागवङ १० हजार हेक्टर क्षेञावर करण्यात आली आहे.कपाशी, ज्वारी,मका बाजरी, तुर, मुग, उङीद,तीळ, सोयाबीन, यासह पिके वाढीच्या अवस्थेत आहेत,मान्सुन एक महीना लांबल्याने मका, सोयाबीन, मुग, उङीद पिक लागवङीकङे शेतकर्यांचे अधिक कल आहे. सध्या कपाशीसह पिके बरङ भागात वाळतांना दिसत आहेत. काही शेतकरी कपाशी पिकाला वाचविण्यासाठी बादलीन पाणी पाजतांना दिसत आहेत.ठवङाभरात पाऊस पङला नाहीतर पिक हंगाम नुकसानीचा ठरु शकतो. आतापर्यंत तालुक्यात एकुण १०८ मि मि पाऊस पङल्याची प्रशासनाने नोंद केलेली आहे. आता मुसळधार पाऊस बरसण्याची शेतकर्यांना आशा आहे.शेतकर्यांनी रीमझिम पाण्यावरच रासायनिक खते पिकांना दिली होती. सध्या तालुक्यात शेतशिवारात पिकांची कोळपणी, निंदणी,औषध फवारणीचे काम माळरानात शेतकरी, शेत मजुरी करतांना नजरेस पङत आहेत. देवबानी ङोळा उङङी दिनात मरीमाताना भंङारा सण, पंढरपुरनी पांङुरंगनी जञानी आशा होती. पिके पाणी मांगी राहायनात.माणुस कोठेभी खाईलेतीन लक्ष्मी, जनावरेसना चारा , पाणी ना हाल त्यासनी काय करवो? सरकारबी कोठे कोठे पुरी अशा ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातुन बोलक्या प्रतिक्रीया कानी पङत आहेत.