Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा ; अन्यथा चक्का जाम आंदोलन करू
    जळगाव

    भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा ; अन्यथा चक्का जाम आंदोलन करू

    By March 31, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात येऊन वीज पुरवठा पूर्ववत करणेबाबत व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.अन्यथा भडगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन शेतकरी प्रदीप देसले यांच्या नेतृत्वखाली तहसिलदार सागर ढवळे यांना देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली आहे.ऊर्जामंत्री थकीत वीज माफीची घोषणा करतात आणि नंतर शब्द फिरवतात.राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुध्द अनेक पक्ष व संघटना यांच्यावतीने रस्त्यावर उतरून हा निर्णय मागे घ्यावा म्हणून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यात येतील अशी घोषणा केली मात्र अधिवेशन संपताच पुन्हा शासनाने वीज तोडण्याचे आदेश दिले.

    शेतकऱ्यांची अवस्था मागील ३ वर्षांपासून सातत्याने होणारी अतिवृष्टी, अवकाळी पाउस व गारपीट यामुळे अत्यंत हलाखीची झाली आहे. मागील काही दिवसात भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास हिरावला गेला आहे त्यातच शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे असताना उलट शेतकऱ्यांची वीज तोडणी वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरु आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या या महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यात यावी व सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांसाठी जळगाव येथे आंदोलन करणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व आंदोलक शेतकरी यांची झालेल्या अटकेच्या आम्ही निषेध करतो.

    शेतकऱ्यांसह जनतेमध्ये वीज वितरण कंपनी विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याने शेतकरी आंदोलकांची ती साहजिक प्रतिक्रिया होती असे आम्ही मानतो. वरील सर्व बाबींचा विचार करता भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा भडगाव तालुक्यातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करतील व नंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे लेखी निवेदनात म्हटले आहे. या वेळी

    प्रदीप देसले ,बबलू पाटील ,दत्तू मांडोळे ,मोनू पाटील ,मंगेश पाटील ,नकुल पाटील ,नवल पाटील ,योगेश पाटील ,अजय पाटील,अमोल मराठे यांच्या सह शेतकरी पुत्र उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif