भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात गिरणा नदी पात्रातील व गावांच्या परिसरातील गावठी दारूच्या हात भट्टीवर भडगाव पोलिसांनी पाच दिवसापासून धाड सत्र सुरू ठेवले आहे. यात हातभट्टी उध्वस्त करण्यात आल्या असून साहित्यांची तोडफोड करून दारुसाठी लागणारे रसायन जाळून नष्ट करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात गिरणा नदी काठा लागत गिरड हद्दी बीट परिसरात पोलिसांनी हातभट्टी वर धाड टाकून नष्ट केल्या. ही कार्यवाही दि.16 रोजी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शन खाली कार्यवाही करण्यात आली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस नाईक भगवान चौधरी, भगवान बडगुजर, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील,रवींद्र हाडपे ,भगवान बडगुजर यांच्या सह कर्मचारी यांचा सहभाग होता. अशी माहिती पोलिस हे. कॉ. भगवान बडगुजर यांनी दिली तसेच सध्या कोरोंना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. तालुक्यात गावठी दारूच्या बोलबाला सुरु असून पोलिसांनी धाडसत्र सुरू ठेऊन या पुढेही सुरू राहणार असून या कार्यवाही मुळे गावठी दारू पडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.