भडगाव प्रतिनिधी- दि २६ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान दिवस निमित्ताने संविधानाचे पूजन करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. तसेच मुंबई येथील आतंकवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष – आण्णा मोरे, ज्येष्ठ पत्रकार – शिवदास आप्पा महाजन, सुनील सोनवणे, भूषण फालगे, तात्या देशमुख, संजय भोई, अमोल गायकवाड, नितीन मोरे आदी उपस्थित होते.