भडगाव तालुका यंदा झाला टँकरमुक्त, अन सिंचन विहीर अधिग्रहीतही मुक्त

0

मागील वर्षी २ गावांना टँकरने केला होता पाणीपुरवठा. तर ४ विहीरी केल्या होत्या अधिग्रहीत, गिरणा धरणात ३३ टक्के पाणीसाठा

भडगाव (सागर महाजन) : भडगाव तालुका सततच्या दुष्काळी चटक्यांनी पाणी टंचाईचे घाव सोसीत होता. भडगाव तालुक्यात २ गावांना पाण्याचे टँकर सुरु होते. तर ४ गावांच्या पाणी पुरवठयासाठी सिंचन विहीरी प्रशासनामार्फत अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यात जलसंधारणाची नाला खोलीकरण, नाला सिमेंट बांध, पाझर तलाव खोलीकरण, गावांना पाणी पुरवठा करणार्या विहीरी खोलीकरण वा आडवे, उभे बोअर करणे ही कामेही तालुक्यात केलेली फायदेशीर ठरली. गतवर्षी सर्वञ दमदार आभाळमाया बरसल्याने गिरणाधरणही शंभर टक्के भरले. भडगाव तालुक्यातही नदी, नाले दुथडी भरुन वाहीले. तालुक्यातील ३१ पाझरतलावांमध्येही मोठया प्रमाणात पाणी साचले. जमिनीत पाण्याची पातळी वाढल्याने वर्षभर पाण्याचा मुबलक पाणी साठा राहीला. त्यामुळे तालुक्यात वर्षभर पाणीटंचाई निर्माण झाली नाही. सध्या जसा भडगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करतोय.तसा भडगाव तालुका यंदा टँकरमुक्त झाला आहे. एवढेच नव्हे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन जी शेतकर्यांच्या सिंचन विहीरी अधिग्रहीत करते. यंदा माञ सिंचन विहीर अधिग्रहीतही मुक्त झाले आहे.

मागील वर्षी २ गावांना पाण्याचे टँकर तर ४ गावांना विहीर अधिग्रहीत

भडगाव तालुक्यात मागील वर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतींच्या पाण्याचे टँकरच्या मागणीनुसार तालुक्यातील मळगाव व तांदळवाडी या २ गावांना पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. तसेच विहीर अधिग्रहीतची ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार तालुक्यातील भोरटेक, आंचळगाव, पासर्ङी, वडगाव बु. या ४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ४ सिंचन विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या होत्या. तसेच या गावांना पाणीपुरवठा करणार्या विहीर अधिग्रहीत शेतमालकांना अदयाप ही पैशाचा पुर्ण मोबदला मिळालेला नसल्याची चर्चा आहे. याबाबत पाणी टंचाई विभागाचे मनोज देवरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले कि, या संबधीत शेतकर्यांसाठीची एकुण रक्कम १ लाख २९ हजार रुपये ८ मे २०२० रोजी पंचायत समिती प्रशासनास प्राप्त झाले होते. ते काही शेतकर्यांना वाटपही करण्यात आले. माञ शासनाकङुन कमी रक्कम आली होती. एकुण लागणारी रक्कम ३ लाख ८७ हजार होती. यापैकी ही फक्त १ लाख २९ हजार रुपये रक्कम आली आहे. पुन्हा उर्वरीत शेतकरी विहीर मालकांसाठी २ लाख ५८ हजार रुपये रक्कम देणे बाकी आहे. दि. ८/५/२०२० रोजी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जळगाव यांचेकङे पञान्वये मागणी केली आहे. अशी माहीती मनोज देवरे यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली. पाणी टंचाईच्या काळात आपली बागायती पिके शेतकर्यांनी सोडुन गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सिंचन विहीरी अधिग्रहीत केल्या होत्या. मग आम्हाला शासनाकङुन आर्थिक मोबदला का वेळेवर मिळत नाही. याकङे शासनाने लक्ष दयावे. अशी मागणी होत आहे.

भडगाव तालुक्यात मागील वर्षी नाला खोलीकरणासह अशी झाली कामे

भडगाव तालुक्यात मागील वर्षी जिल्हा परीषद विभागामार्फत जलयुक्त शिवार फेरी शासनाच्या योजनेतुन ४८ लाख ९५ हजार निधीतुन नाला खोलीकरण, साठवण बंधारा दुरुस्ती, सिमेंट नाला बांध बांधणे आदि कामे करण्यात आली. तालुक्यात नाला खोलीकरण करणे यात टोणगाव, बांबरुङ प्र. उ, पिंपळगाव बु, भडगाव या गावात नाला खोलीकरणाची कामे करण्यात आलेली होती. तसेच तालुक्यात साठवण बंधारा दुरुस्तीचे कामे बोरनार येथे करण्यात आले होते. तसेच तालुक्यात सिमेंट नाला बांध बांधणे उमरखेड, वडजी, बांबरुड प्र. उ, कराब येथे करण्यात आले होते. भडगाव तालुक्यात मागील वर्षासह मागील टंचाईच्या काळात नाला खोलीकरण, पाझर तलाव खोलीकरण यासह शासनाच्या योजनेतुन ही कामे करण्यात आली. तालुक्यात पाणी टंचाईवेळी मागील काळात जमिनीची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकर्यांनी सिंचन विहीरींचे खोदकाम, गावांना पाणी पुरवठा करणार्या अनेक विहीरींचे खोदकाम, आडवे व उभे बोअरचे कामे गावोगावी करण्यात आली. या सर्व कामांसह जलसंधारणाच्या कामांचा फायदा मागील वर्षी सर्वञ अतीवृष्टी व जोरदार आभाळमाया बरसल्याने पाणी साचल्याने पाणी टंचाई दुर करण्यास मोठा फायदयाचा ठरला होता.

भडगाव तालुक्यात पाउसाने मागील वर्षी धुवाधार बॅटींग केल्याने पाणी टंचाई झाली दुर –
मागील वर्षी तालुक्यात अतिवृष्टीसह जोरदार आभाळमाया बरसली. तालुक्यात मागील वर्षी १ हजार १०.३५ मिली मिटर पाउस बरसल्याची महसुल प्रशासनाने नोंद केलेली आहे. म्हणजे मागील वर्षी पाउसाळा शंभरी टक्यांनी पार करुन गेला. चारो और पाऊसाने जमिनीची भुक भागत मुबलक पाणीसाठा साचला होता. विहीरी अनेक वर्षातुन प्रथमच ओसांडून वाहील्या. नदी नाल्यांना चांगला पुर वेळोवेळी गेला होता. गिरणा नदी काठ नाशिकच्या गिरणा धरणावर अवलंबुन असतो. माञ सर्वञ पाऊसाने धो धो धुवाधार बॅटींग केल्याने गिरणा धरणही पुर्णपणे भरले होते.गिरणा धरणाला सुमारे १३ वर्षानंतर पाण्याने भरत प्रथमच शंभरी पार केल्याचे दिसुन आले. गिरणा धरण भरल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा यासह इतर काही तालुक्यांना पाणी टंचाई दुर सारण्यास मोलाची मदत झाली होती. सतत पाणी टंचाईचे चटके सोसणारा भडगाव तालुका पाणी टंचाई दुर करण्यास मुबलक पाणी साठयाने पाणी टंचाईमुक्त झाल्याचे दिसुन आले. निसर्गाच्या चमत्काराने चारो और पाणी मुबलक राहीले. भडगाव तालुक्यातील ३२ पाझरतलावातही सरासरी ७० ते ८० टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला. तालुक्यातील ३२ पाझर तलावही मागील वर्षी भरले होते ७० ते ८० टक्के

भडगाव तालुक्यात ३२ पाझर तलाव आहेत. यात आडळसे, तांदळवाडी, महींदळे, पळासखेडे, वलवाडी, कजगाव, जुवार्ङी २, शिवणी १, तळबण तांडा १, वाडे १, वाडे २, मळगाव २, पासर्ङी, आंचळगाव १, आंचळगाव २, आंचळगाव ३, आंचळगाव ४, आंचळगाव ५, पथराङ, शिवणी २, वलवाङी २, भोरटेक ३, पळासखेङे २, पळासखेङे ३ , शिंदी १, शिंदी २, तळबण तांङा २, बांबरुङ प्र ब, गुढे, जुवार्ङी हे पाझर तलाव सिंचन विभागाच्या अहवालानुसार सरासरी ७० ते ८० टक्के भरले होते..तसेच यात सध्या ६ पाझर तलावांमध्ये आङळसे, तळबण तांडा, आंचळगाव ३, पथराड, पळासखेङे ३, तळबण तांङा २ या सर्व पाझरतलावात सध्या सरासरी ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर २५ पाझर तलाव सध्या कोरङेठाक पङल्याची माहीती सिंचन विभागाच्या सुञांनी दिली. माञ मागील वर्षी भडगाव तालुक्यात जोरदार पाऊसाने व गिरणा नदीच्या पाण्याने पाणी टंचाई दुर झाली आहे.

पाझर तलावांतील पाणीसाठाही वर्षभर चांगला टीकला. शेती सिंचनासह , पिण्याचे पाणी व मासे मारी उदयोगासाठीही पाझर तलाव यंदा मोलाचेच ठरल्याचे दिसुन आले. भङगाव तालुका यंदा टँकरमुक्त व विहीर अधिग्रहीत मुक्तच राहीला— मागील वर्षी भङगाव तालुक्यात शंभर टक्के पाऊस बरसला. त्यात गिरणा नदीलाही पाण्याचे आवर्तन सुरुच राहीले. यंदा रब्बी हंगामासाठी गिरणा जामदा कालव्यातुन उजवा व ङावा कालव्यांनाही पाण्याचे आवर्तन मिळाले. भङगाव तालुक्यात चारो और पाणी असल्याने भर उन्हाळयातही भङगाव शहरासह कोणत्याच गावाला पाणी टंचाई नाही. असे प्रशासनाच्या माहीतीनुसारही समजत आहे. यावर्षी भङगाव तालुक्यात कोणत्याच ग्रामपंचायतींनी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर वा सिंचन विहीर अधिग्रहीत करण्यासाठी पंचायत समिती वा प्रशासनाकङे मागणीही केलेली नाही. तसेच भङगाव तालुक्यात संभाव्य पाणी टंचाईसाठी तालुका कृती आराखङा तयार केला जातो. तर कोणत्याच ग्रामपंचायतीची मागणी न आल्याने संभाव्य टंचाईचा तालुका कृती आराखङाच यंदा तयार करण्याची वेळ आली नाही. माञ भङगाव पंचायत समितीत पाणी टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणी टंचाई कृती आराखङा तयार करण्यात आला नाही हे माञ पहील्यांदाच ऐकायला मिळाले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

भङगाव तालुक्यासह शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय चांगला

भडगाव शहरासह तालुक्यात पाणी पुरवठा विहीरींना चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी पुरवठा जवळपास २ ते ३ दिवसाआड मिळत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे. गिरणा धरणात सध्या ३३ टकके पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीवर अनेक गावांना पाणी पुरवठा करणार्या योजना कार्यरत आहेत. गावात वा शेतात कोणत्याच विहीरींचे खोदकाम करण्याची वेळही यंदा आली नाही. गिरणा नदीच्या वेळोवेळी आलेल्या पाण्याच्या आवर्तनाने शहरासह तालुक्यात गिरणा काठासह पाणी पुरवठा योजनेद्बारा चांगला पाणी पुरवठा होत असल्याचे आतापर्यंत दिसुन चिञ आहे. भङगाव शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणारा गिरणा नदीवरचा मातीचा कच्चा बंधारा मागील वर्षी पुराच्या पाण्याने वाहुन गेला होता. माञ या उन्हाळयातही या बंधार्यात पाणी न साचल्याने पाणी वाहुन गेले. माञ शेजारी असलेल्या शहराला पाणी पुरवठा करणार्या विहीरींना मुबलक पाणीसाठा असल्याने शहरात २ ते ३ दिवसाआङ पाणी पुरवठा करण्यास नगर परीषदेलाही फायदयाचेच ठरतांना दिसत आहेत.

शहरातील बोअरही यंदा आटल्या नाहीत. भङगाव शहरासह तालुक्यात पाणी टंचाई पाहायला न मिळाल्याने नागरीकातही समाधान व्यक्त होत आहे.यावर्षी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने बागायती कापुस लागवङीकङे शेतकर्यांचा अधिक कल वाढलेला दिसत आहे.बागायती कापुस लागवङ क्षेञात यंदा लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे. कापुस उत्पादक शेतकरी कापुस लागवङीसाठी धावपळ करतांना दिसत आहेत. रानोमाळ कापुस लागवङीसाठी सर्या पाङणे वा ठिबक सिंचन आंथरणे, शेती मशागतीचे कामे करतांना शेतकरी दिसत आहेत. मागील वर्षाच्या धो धो पाऊसाने जमिनीची पाण्याची भुक भागविली होती.यंदा मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम शेतकर्यांना चांगला तारणारा ठरला. जनावरांचा चारा, पाणी प्रश्नही चांगला सुटण्यास शेतकर्यांना मदत झाली आहे.

भङगाव तालुक्यातील ३२ पाझर तलावांमध्रे यंदा सरासरी ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध राहीला. त्यामुळे परीसरातील शेतातील सिंचन विहीरींची पाण्याची पातळी वाढली. पर्यायाने परीसरातील शेतमालकांना जनावरांचा चारा पाणी प्रश्न मार्गी लागला. तर पाझरतलावातील पाण्यामुळे तालुक्यात ४ मत्स सोसायटया असुन मासेमारी व्यवसायातुन उत्पन्न मिळाले. गिरणा नदीलाही वेळोवेळी येणार्या पाण्याच्या आवर्तनाने साचलेल्या पाण्याच्या ङबक्यांमध्ये सावदे, भङगाव गिरणा बंधार्यांजवळ, घोङदे गिरणा पाञात साचलेल्या पाण्यात अनेक नागरीक मासेमारी करतांना वेळोवेळी दिसुन आले. यंदा मुबलक पाण्याने मासेमारी व्यवसायाला चालना मिळाली. नागरीकांना उत्पन्नाचे साधन ठरल्याचे दिसुन आले.

Leave A Reply

Your email address will not be published.