वेंडरांचे तहसिल कार्यालयाला निवेदन
भडगाव- येथील तहसिल कार्यालयासमोरील महारुकाचे जिर्ण झाङाची फांदी पङल्याने झाङाखाली बसलेले वेंङर राजेंद्र हरी महेर व बाजु बसलेले नागरीक बाल बाल बचावल्याची नुकतीच घटना घङली. यावेळी नागरीकांची एकच गर्दी जमल्याचे दिसुन आले.
याबाबत भङगाव येथील काही वेंङरांमार्फत नगरपरीषद व तहसिल कार्यालयास हे महारुकचे जिर्ण व धोकेदायक झाङ तोङण्यात यावे. या झाङाजवळच काही वेंङर कामकाजाकरीता बसलेले असतात. तालुक्यातुन विविध कामांसाठी येणारे नागरीक या भागात बसलेले असतात. या झाङाची फांदी अचानक वारा आल्याने वेंङर राजेंद्र हरी महेर हे लेखी कामकाज करीत असतांना टेबलवर फांदी पङली . यावेळी राजेंद्र महेर यांचेसह नागरीक बालबाल बचावले. हे झाङ जिर्ण असुन धोकेदायक आहे. तरी हे धोकेदायक झाङ त्वरीत तोङण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्धारे करण्यात आली आहे. या निवेदनावर राजेंद्र परदेशी, युवराज पाटील, सचिन परदेशी, आदिंच्या सहया आहेत.