भडगाव | प्रतिनिधी
भडगाव येथून चाळीसगाव जाणार्या बसवर समोरून येणार्या स्विफ्ट या गाडीच्या चालकाने अचानक स्क्रू ड्रायव्हर मारून फेकल्याने बसचा समोरील काच फुटला या बाबत भडगाव पोलिस स्टेशन ला चालकाविरुद्ध अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की , भडगाव येथून चाळीसगाव येथे जाणार्या बस नंबर एम. एच.15 बी. टी.2562 ही बस जात असताना. शहरातील पाटचारी जवळ समोरून चाळीसगाव कडून भडगाव कडे येणार्या स्विफ्ट डिझायर गाडी नंबर एम. एच.02 बीआर.2053 यावरील चालकाने कारण नसताना बसच्या पुढील बाजूच्या काचेवर स्क्रू ड्रायव्हर मारला या मध्ये बसचा काच फुटला या बाबत बस चालकाने भडगाव पोलिस स्टेशन ला स्विफ्ट चालक केशवनाथ सुकलाल सजवळ रा. जळगाव याच्या विरुद्ध अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून स्विफ्ट गाडी जमा करण्यात आली आहे.
मोठी दुर्घटना टळली
भडगाव कडून चाळीसगाव कडे जात असताना यामध्ये प्रवासी बसले होते. व अचानक समोरून काचेवर काहीतरी मारून फेकले असे लक्षात येताच बस चालकाने थांबविली. या वेळी जळगाव- चांदवड महामार्गाचे काम चालू असल्याने फक्ट एका बाजूने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असून रस्त्याची उंची वाढल्याने दुतर्फा रस्ता हा उंच झाल्याने खोलगट भाग तयार झाला आहे. एखाद्या वेळेस जर बसचा ताबा सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती या बाबत चालकाने प्रसंगावधान राखत बस रोखली. व प्रवाशी यांना दुसर्या बसमध्ये बसवले.