भडगाव (प्रतिनिधी) : येथील आंचळगाव रस्त्याला शेतात राहत असलेल्या एका इसमाचा गिरणा नदी पुलाहून नदी पात्रता पडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली.
दि. १५ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पेठ व भडगाव भागाला जोडणाऱ्या गिरणा नदी पुलावरून जात असतांना अमरसिंग पूना सोनवणे (वय ४२ रा. लोणवाडी, ह.मु. आंचळगाव रस्ता भडगाव) हे पुलाहून पाय घसरून गिरणा नदी पत्रात पडल्याची झाल्याची घटना घडली.
याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यास भडगाव ग्रामीण रुग्णांलयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत मृताचे नातलग आनंदा गांगुर्डे यांच्या खबरीहून भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.