भडगाव कोविड सेंटर मधील रुग्णांना अंडी व बिस्कीट वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : रुग्ण सेवा हीच खरी सेवा या प्रमाणे आज भडगाव येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या 80 रुग्णांना अंडी व बिस्कीट पुडे महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका सरचिटणीस सोनू महाजन व मित्र परिवार यांनी केले वाटप.

कोविड-19 चे उपचार घेत असलेल्या 80 रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप यावे व तसेच त्यांना पोषक आहार मिळावा या हेतूने आज पाचोरा रोड वरील शासकीय आय.टी.आय( कोविड सेंटर) येथे सायंकाळी सहा वाजता 10 क्यारेट अंडी व 200 बिस्कीट पुडे महाराष्ट्र माळी समाज महासंघ भडगाव तालुका सरचिटणीस सोनू महाजन, लाला परदेशी, सचिन पवार, नितेश पाटील यांनी वाटप केले. या वेळी डॉ. प्रियांका पाटील, डॉ. पुनम पाटील, गोरख धनगर, खलील सर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.