भडगाव – शहरातील सुतार समाज वतीने श्री विश्वकर्मा जंयती विश्वकर्मा प्लायवुड येथे साजरी करण्यात आली.
श्री. विश्वकर्मा यांची पालखी संजय शार्दुल यांच्या दुकानापासुन चाळीसगाव रोड पर्यत पालखीची मिरवणुक काढण्यात आली. प्रथम श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पमाला सुनिल मिस्तरी यांच्या हस्ते अर्पण करुन आरती करण्यात आली. यावेळी सुधाकर खैरनार यांनी विश्वकर्मा यांच्या कार्याची माहीती प्रवचनातुन दिली. यावेळी सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने होते व महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल मिस्तरी, बापु शार्दुल, सुरेश बोरसे, संजय शार्दुल. भगवान शार्दुल, नाना जाधव, महेद्र मिस्तरी, विजय देवरे, भावडु निकम, दिपक गायके, अतुल शार्दुल सह सर्व सुतार समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.