भडगावात विविध संस्थांसह नागरीकांनी स्विकारली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी

0

भडगाव :- येथील नगरपालिकेच्या वतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वेषभुषेतील विद्यार्थी वृक्षदिंडीचे आकर्षणाचे केंद्रविंदु ठरले. तर विविध संस्थानी व नागरीकांनी वृक्ष संवर्धाची जबाबदारी घेत वृक्षांचे पालकत्व स्विकारले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरध्यक्ष अतुल पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी विकास नवाळे,
उपनगराध्यक्ष डाॅ. वासिम मिर्झा,नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, माजी नगरध्यक्ष सुनील देशमुख, स्विकृत नगरसेवक डाॅ.प्रमोद पाटील, जागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल परदेशी, प्रा.दिपक मराठे, माऊली फाऊंडेशन चे युवराज सुर्यवंशी, संतोष महाजन,जगन भोई, प्राचार्य वैशाली पाटील, जाकीर कुरैशी, सचिन चोरडीया, नागेश वाघ, सुनील कासार नगरअभियंता रणजीत पाटील, लिपीक नितीन पाटील, स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता गणेश लाड, आरोग्य निरीक्षक छोटु वैद्य, कार्यालयीन अधिक्षक परमेश्वर तावडे आदी उपस्थित होते.

वृक्षदिंडी ठरीली आकर्षक

पालिकेच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. कीसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास पालिका कार्यालयाजवळ वृक्षांचे रोप ठेवलेले पालखीचे नगरध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तेथुन वृक्षदिंडी खोलगल्ली, मेन रोड, तहसील कार्यालय चौक, बसस्थानक, बाळद रोड या मार्गाने शिव काॅलनीतील पालिकेच्या गार्डमधे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत विद्यार्थ्यांना परीधान केलेले विविध पोषाख दिंडीचे खास आकर्षण ठरले. स्वच्छता व वृक्षारोपणाच्या संदर्भातील घोषणांनी परीसर दणाणून गेला होता.

गार्डनमधे वृक्षारोपण

पालिकेच्या वतीने शहरात 5 हजार झाडे लावण्यात येणार आहे. आज शिव काॅलनीतील गार्डन मधे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रस्ताविकातुन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी नागरीकांनी झाडाचे पालकत्व स्विकारण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनला साद देत जागृती मित्र मंडळ, माऊली फाउंडेशन, नगरसेवकांनी झाडांचे संगोपन करण्याचा यावेळी निर्धार केला. नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका योजना पाटील, प्रा.दिपक मराठे, जाकीर कुरैशी यांनी मनोगत व्यक्त केले.

१० फुट झाडांची लागवड

लागवड केलेली झाडे पुर्णपणे जनत व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने १०-१२फुट झाडांची लागवड करण्यात येत आहे. त्यांना ट्री गार्ड ही बसविण्यात येत आहे. लावलेली झाडे शंभर टक्के जतन करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाच्या वतीने नुसती वक्षलागवड मोहीम न घेता वृक्षारोपण व संगोपण मोहीम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळाना मोहीमेत सहभागी करून घेण्यात आहे.

पालिकेने वृक्षारोपण बरोबरच वृक्षसवंर्धाची मोहीम हाती घेतली आहे. यात भडगावकरांनी सहभागी व्हावे. पालिका क्षेत्रात पाच हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
– विकास नवाळे, मुख्याधिकारी नगरपरीषद, भडगाव

भडगावातील प्रत्येक नागरीकांनी शहर हीरवेगार करण्यासाठी वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी व्हावे. पालिकेचे पदाधिकारी ही झाडे दत्तक घेणार आहोत.
-अतुल पाटील नगरध्यक्ष, भडगाव

Leave A Reply

Your email address will not be published.