भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार आहे. त्यासाठी लोकांनी कुठल्याही लोभाला बळी न जाता तसेच मतदान हा आपला अधिकारच नाही तर राष्ट्रीय कर्तव्य, नैतिक जबाबदारी समजून योग्य मतदान करावे.यासाठी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बालविकास प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच आपल्या रांगोळीतून मतदानाबद्दल संदेश दिला.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली देखिल काढण्यात आली होती.रॅलीत विद्यार्थ्यांनी आपले मत, आपली ताकद अश्या घोषणा देत मतदाना ची जनजागृती केली.तसेच मतदानाच्या जनजागृती साठी पालकांकडून देखील संकल्प पत्र भरून घेण्यात आले.
सदर कार्यक्रमांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती रामकुवर यांचे मार्गदर्शन तसेच शाळेच्या उपशिक्षिका सुनिता सूर्यवंशी, अमोल बिऱ्हाडे,अर्चना खांडेकर,विकास झोडगे,सागर महाजन,अंजली सोनवणे,वंदना पवार,सिमा सोनवणे, कु.गायत्री पाटील, पूजा कासार, श्वेता सोनार व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.