भडगाव प्रतिनिधी
येथील नगरपरीषदेने शहरात प्लास्टीक बंदी करण्याच्या करण्याच्यादृष्टीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेत प्लास्टीक बँकेची स्थापना स्थापना करण्यात आली असुन एक पिशवी भरून प्लास्टीक आणा अन् एक कापडी पिशवी घेऊन जा अशी मोहीम हाती घेतली आहे. या प्लास्टीक बॅकेला शहरातुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यात अशा पध्दतीने प्लास्टीक बँकेची पहील्यांदाच स्थापना झाली आहे.
देशात प्लास्टीक वापरावर बंदि आणण्यात आली आहे. त्यादृष्टीने भडगाव नगरपरीषदेने प्लास्टीक बॅकेची स्थापना करून अभिनव पध्दतीने प्लास्टीक बंदिची मोहीम हाती घेतली आहे. कदाचित राज्य अशा प्रकारची पहील्यांदाच बँकेची स्थापना करण्यात आली आहे. प्लास्टीक बंदिच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
![](https://lokshahilive.com/wp-content/uploads/2019/10/3-1024x583.jpg)