भीषण दुष्काळात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी उचलले पाऊल…
भडगाव :- येथील माऊली फाउंडेशनतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही पाणपोईच्या माध्यमातून मोफत थंडगार जल सेवा सुरू केली आहे. मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ‘पाणपोईचे उद्घाटन” झाले. सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिमेचे पूजन केले. योगेश शिंपी यांनी प्रास्तविकातून फाऊंडेशनच्या सामाजिक ,विधायक कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी डॉ. आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र मोरे व रमेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी तसेच नगरसेविका योजनाताई पाटील व डी. डी. पाटील सर, सचिन महाजन, हर्षल वाणी, सुजित दुडे ,आनंद चावरेकर ,संजय सोनार, देवेंद्र पाटील, मोहन अग्रवाल, विशाल सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
यावर्षीचा भीषण दुष्काळ लक्षात घेता या जल सेवेचा लाभ परिसरातील नागरिकांनी, प्रवाशांनी, वाहनचालकांनी घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुशील महाजन, सतीश शिंदे,रवी पाटील, एकनाथ पाटील, चुडामन पाटील, श्याम पाटील यांचे सहकार्य लाभले.