भडगावात पोलिसांचे पथ संचलन (रूट मार्च

0

भडगाव – प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना या संदर्भात प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणुनच आज भडगाव शहरात पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातुन पथ संचालन करण्यात आले.
यावेळी पोलिसांच्या वाहनातुन ध्वनीक्षेपकावरुन जनतेला करोनाच्या बाबत जागृत करण्यात आले. नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपण अत्यावश्यक कारण असल्यावरच घराच्या बाहेर निघावे.विनाकारण घराच्या बाहेर जर कुणी फिरतांना आठळला,कुणी धार्मिक भावना भडकावणारे लिखाण, व्हाँटस्अँप वर मँसेज पाठवले तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले आहे.
हे पथसंचलन आज सकाळी १०:३० ते ११:३५ वाजता मेन रोड, बाजार चौक, मेढ्या मारोती मंदिर, टोंनगाव, समर्पण हॉस्पिटल, बाळद रोड, पारोळा चौफुली, बस स्टँड, पाचोरा चौफुली, ते पोलिस स्टेशन या मार्गावर काढण्यात आले. यात पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, भडगाव पोलीस स्टेशन स्टॉप तसेच जळगाव मुख्यालय येथील एक स्ट्रॉकिंग फोर्स, होमगार्ड पथकातील दहा कर्मचारी असे एकूण 2 अधिकारी २२ कर्मचारी 10 होमगार्ड व १ स्ट्रॉकींग फोर्स हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.