भडगावात निघाली प्लस्टिक कॅरीबॅगची वाजत गाजत अंत्ययात्रा

0

नगरपालिकातर्फे प्लास्टिकविरोधी जनजागृतीचा अनोखा उपक्रम

भडगाव;- येथील नगरपालिकेतर्फे आज प्लास्टिक कॅरीबॅगबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने प्लॅटिक कॅरीबॅगची अंत्ययात्रा वाजत-गाजत ट्रॅक्टरवर काढण्यात येऊन विविध घोषणा देण्यात आल्या . या अंत्ययात्रेने भडगावकरांचे लक्ष वेधून घेतली होते . दरम्यान प्लास्टिक कॅरीबॅगविरोधात नगरपालिकेची जोरदार मोहीम सुरु आहे .

नगरपालिका कार्यालयापासून सकाळी दहा वाजता ट्रॅक्टरवर काढण्यात आली, यात हुबेहूब कॅरीबॅग , प्लास्टिक चा पुतळा बनवून त्याची अंत्ययातत्रा बँड लाऊन शहरातून काढण्यात आली. , यात स्वच्छ शहर, सुंदर शहर, प्लास्टिक मुक्त भडगाव शहर, प्लास्टिक कॅरीबॅग तुला नरकात स्थान मिलो. असा संदेश शहरात देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सी. एम. वाघ , भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या सह नगरसेवक – अमोल नाना पाटील, नगरसेवक – अतुल पाटील, कर्मचारी छोटू वैद्य, जोसेफ मारसले ,सर्पमित्र विजय कांडारे, मनीष पवार, परेश पाटील, कल्याण देशमुख, संजय नरवाडे, राजेंद्र पवार, सुनील पवार, रवींद्र जाधव, दिलीप कोळी, किशोर पाटील, सुरेश पाटील आदि कर्मचारी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.