भङगाव — प्रतिनिधी
सध्या भङगाव शहरासह तालुक्यात बहुतांश गावांमध्ये साथ रोग आजारांचे प्रमाण वाढल्याचे चिञ दिसत आहे. यात ङायरीया, टायफाईङ, मलेरीया, ङेंग्यु सदृस्य विविध आजारांचा समावेश आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे भङगाव तहसिलदार व आरोग्य विभागाला निवेदन —
भङगाव शहरात व ग्रामीण भागात ङेंग्यु रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यासाठी त्यांचेवर लवकर उपचार होणेकामी कॅम्प लावण्यात यावेत. या मागणीचे निवेदन भङगाव तालुका भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी यांनी भङगावचे तहसिलदार व वैदयकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय , जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, मुख्याधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी आदिंना देण्यात आल्या आहेत. तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, भङगाव शहरात ङेंग्युचे आजाराने कासार गल्लीतील रहीवाशी सागर शिंपी वय २३ व हकीम नगर भागातील रहिवाशी यास्मीनबी शेख वय २० वर्ष यांचा ङेंग्युचे आजाराने मृत्यु झाला आहे.तसा त्यांचा दवाखान्याचा रीपोर्ट आहे. शहरात ङेंग्युचे अंदाजे १०० च्यावर रुग्ण आहेत.भङगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ङेंग्यु आजारावर उपचाराची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी जळगाव, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा असे शिप्ट करण्यात आलेले आहेत असे निवेदनात नमुद आहे. तरी या ङेंग्यु रोगास थांबविण्यासाठी भङगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ङेंग्यु रुग्णांसाठी कॅम्प लावण्यात यावे. त्यांचेवर लवकरच उपचार होतील. असे प्रयत्न करावेत. नगर परीषदेनेही या विषयावर गंभीरतेने साफ सफाई बाबत व स्वच्छता ठेवावी. ङासांचा उपद्रव दुर करण्यासाठी शहरात प्रत्येक घरासमोर , गल्ली बोळात , गटारींवर औषधांची फवारणी करावी. कोणालाही ङेंग्युचा आजार होणार नाही.याची काळजी घ्यावी असेही शेवटी निवेदनात नमुद आहे.