भडगावः- प्रतिनिधी नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने समाज मंदीरात छत्रपती शिवाजी महाराज याचे विश्वासु अंगरक्षक शुरविर जिवाजी महाले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य घडविण्यासाठी ज्या शुरविरांनी आपले बलिदान दिले. त्यापैकी एक असलेले शुरविर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासु अंगरक्षक जिवाजी महाले याची जयंती नाभिक समाज मंदीरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. प्रथमतः नाभिक समाज मंदीरात चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ, भडगाव अध्यक्ष संजय पवार सह जेष्ठ समाज बांधव यांच्या हस्ते जीवा महाले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. होते जिवाजी म्हणुन वाचला शिवाजी, जीवाजी महाले की जय अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ व समाजध्यक्ष संजय पवार (पत्रकार) यांनी जिवाजी महाले यांच्या जीवनकार्या विषयी माहिती दिली. यावेळी कार्यकारणी सदस्य विजय पवार याचा वाढदिवस निमित्ताने तर रवि अहिरे याची चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणुन फेरनिवड झाल्याने त्याचा मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक मंडळाचे अध्यक्ष संजय पवार(पत्रकार), उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, शिवाजी शिरसाठ, राजेंद्र सोनवणे, निलेश महाले, सुभाष ठाकरे, विजय पवार, राजेद्र महाले, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, नाना नेरपगारे, दयाराम ठाकरे, पोपटराव नेरपगारे, बबलु पवार सह शहरातील समाज बांधव उपस्थित होते.